Family unrecorded

Krishnabai Utsav

India

कृष्णाबाई उत्सव हा कृष्णा नदीशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या वाई, कराड, संगम माहुली, लिंब या गावांमध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.

No licensed photograph yet
Four in five rooms open without one. Add a photograph with a declared licence and your credit sits under it, permanently.
Archival typographic plate · seeded for Krishnabai Utsav+ Add licensed photo →
Understand in 30 Seconds · In Plain Words

Quick guide to Krishnabai Utsav

Sourced or Silent · CC BY-SA 4.0

कृष्णाबाई उत्सव हा कृष्णा नदीशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे.

01 · What it is
Living Tradition

Documented cultural tradition on record; family classification awaits an editor.

02 · Where & name
India

Placed on record in India.

03 · How it is doing
□□□□ (Not yet assessed)

Documented in open cultural records, but no cited field assessment of its current vitality has been added here yet.

04 · Proof & reuse
2 cited sources

Every claim links to a public record below. Free to quote, teach, and share under CC BY-SA 4.0.

Chapter Takeaways
धार्मिक महत्वस्कंद पुराण या ग्रंथात कृष्णा नदीच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे.कृष्णा नदी ही विष्णू या अवताराचे स्त्री रूप मानले जाते.
कथाअफजलखानाच्या स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना विजय मिळावा यासाठी तत्कालीन वाई ग्रामस्थांनी नदीला नवस केला होता.
उत्सवाचे स्वरूपइसवी सन १८८० पासून वाईच्या जोडीने माहुली येथेही हा उत्सव वैशाख महिन्यात संपन्न होतो.
वैशिष्ट्येवाईमधील या उत्सवाचे आयोजन वाई गावातील सात घाटांवर केले जाते.
Common Questions Answered on Record
What is Krishnabai Utsav in plain words?

कृष्णाबाई उत्सव हा कृष्णा नदीशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे.

Where is Krishnabai Utsav practised or documented?

Sources on this page place Krishnabai Utsav in India.

What is the current condition of Krishnabai Utsav today?

□□□□ (Not yet assessed): Documented in open cultural records, but no cited field assessment of its current vitality has been added here yet.

How do I cite or share this Krishnabai Utsav entry?

Cite as: "Krishnabai Utsav." folkroom, https://folkroom.org/art-forms/krishnabai-utsav, text CC BY-SA, with attribution.

Share or cite this roomNo tracking · CC BY-SA 4.0
WhatsAppXLinkedInRedditFacebook

The tradition & historical record

2 min read · 2 sources

कृष्णाबाई उत्सव हा कृष्णा नदीशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या वाई, कराड, संगम माहुली, लिंब या गावांमध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. माघ शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन पौर्णिमा या काळात हा उत्सव संपन्न होतो. 1

धार्मिक महत्व

स्कंद पुराण या ग्रंथात कृष्णा नदीच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे.कृष्णा नदी ही विष्णू या अवताराचे स्त्री रूप मानले जाते. त्यामुळे ती समाजात नदी आणि देवता दोन्ही स्वरूपात पूजनीय मानली जाते. 1

कथा

अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना विजय मिळावा यासाठी तत्कालीन वाई ग्रामस्थांनी नदीला नवस केला होता. शिवाजी राजांनी खानाचा वध केला आणि विजय मिळविला त्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाली अशी याची कथा प्रचलित आहे. 1

उत्सवाचे स्वरूप

इसवी सन १८८० पासून वाईच्या जोडीने माहुली येथेही हा उत्सव वैशाख महिन्यात संपन्न होतो. उत्सवासाठी मंडप उभारणे, घाटाची स्वच्छता करणे, कृष्णाबाईची मूर्ती पालखीत घालून मिरवणूक काढणे, भजन कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांचे हळदीकुंकू, गायनाचे कार्यक्रम अशा उपक्रमात नागरिक सहभागी होतात. सांगतेच्या दिवशी सर्वांसाठी भोजन प्रसादाचे आयोजन केले जाते. कृष्णा नदीचे पाणी पारंपरिक कलशात भरून त्याची स्थापना देवीच्या मुर्तीपुढे केली जाते. या कलशाला गींडी असे संबोधतात.या कलशाची उत्सवीकाळात दररोज पूजा केली जाते. 1

वैशिष्ट्ये

वाईमधील या उत्सवाचे आयोजन वाई गावातील सात घाटांवर केले जाते. याचा क्रम ठरलेला असून त्यानुसार त्या त्या घाटावर उत्सवाशी संबंधित कार्यक्रम ठरलेले असतात. मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी, गांगापुरी अशा क्रमाने उत्सव केला जातो. धार्मिक विधीच्या माध्यमातून उत्सवाला प्रारंभ होतो. त्यानंतर पुढील चार पास दिवस भक्तगण दर्शनासाठी येतात. काही घाटांवर देवीची पालखीतून तर काही ठिकाणी रथातून मिरवणूक काढली जाते. कृष्णामाई म्हणून नदीची ओटी महिला भाविक भरतात. शेवटच्या दिवशी प्रसादाचे आयोजन केले जाते. 1

सामाजिक महत्व

गावातील विविध भागांमध्ये होत असलेल्या या उत्सवाचे सर्व नियोजन त्या त्या परिसरातील, आळीतील सदस्य मिळून करत असतात. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र होवून या उत्सवात विविध जबाबदारी पार पाडतात. भोजन प्रसाद तयार करण्याचे कामही गावातील सदस्य मिळूनच करतात त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपणारा उत्सव या आर्थाने स्थानिक परिसरात या उत्सवाचे विशेष महत्व मानले जाते. 1

The text above is adapted from the Wikipedia article “कृष्णाबाई उत्सव”, available under the Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 licence. 1

Krishnabai Utsav is festival dedicated to River Krishna in Maharashtra, according to the structured record cited below. This entry was generated automatically from that record and has not yet been reviewed by a person familiar with the tradition. 2

No recording linked yet — know one? Point at it →
Sourced or Silent · Still Open

Questions awaiting a cited source

+ Answer with a source →
How many people perform it today?
When is it first attested, and by whom?
What does it look like? No licensed photograph yet.