Family unrecorded

Shaktivale vs Turevale

शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले या कलेचा उगम व ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट सांगताना आपल्याला कोकणातील शाहीर परंपरा, डफावरील गायकी, आणि सवाल-जवाब जुगलबंदी परंपरा या तिन्हींचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

No licensed photograph yet
Four in five rooms open without one. Add a photograph with a declared licence and your credit sits under it, permanently.
Archival typographic plate · seeded for Shaktivale vs Turevale+ Add licensed photo →
Understand in 30 Seconds · In Plain Words

Quick guide to Shaktivale vs Turevale

Sourced or Silent · CC BY-SA 4.0

शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले या कलेचा उगम व ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट सांगताना आपल्याला कोकणातील शाहीर परंपरा, डफावरील गायकी, आणि सवाल-जवाब जुगलबंदी परंपरा या तिन्हींचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

01 · What it is
Living Tradition

Documented cultural tradition on record; family classification awaits an editor.

02 · Where & name
Geography awaiting source

Add a cited source naming the region or community that carries it.

03 · How it is doing
□□□□ (Not yet assessed)

Documented in open cultural records, but no cited field assessment of its current vitality has been added here yet.

04 · Proof & reuse
2 cited sources

Every claim links to a public record below. Free to quote, teach, and share under CC BY-SA 4.0.

Chapter Takeaways
इतिहास व कालखंड"शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले" ही परंपरा सुमारे 300-400 वर्षांपूर्वीपासून कोकणात प्रचलित असल्याचे स्थानिक संशोधकांचे मत आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमीशक्तीवाले विरुद्ध तुरेवाले या कलेचा उगम शाहीर परंपरा|शाहीर परंपरेतून झाला आहे.
सादरीकरणाची पद्धतया कलेमध्ये दोन गट असतात: शक्तीवाले: गायनातील ताकद, शब्दसामर्थ्य, वाकपटुत्व व सुरेलता यांच्या जोरावर संवाद साधणारा गट.आदीशक्ती एक रूप असते.
सांस्कृतिक महत्वसमाजप्रबोधन व लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम.
Common Questions Answered on Record
What is Shaktivale vs Turevale in plain words?

शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले या कलेचा उगम व ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट सांगताना आपल्याला कोकणातील शाहीर परंपरा, डफावरील गायकी, आणि सवाल-जवाब जुगलबंदी परंपरा या तिन्हींचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

Where is Shaktivale vs Turevale practised or documented?

No verified geographic place has been linked on record yet — editors can add a cited place from the edit page.

What is the current condition of Shaktivale vs Turevale today?

□□□□ (Not yet assessed): Documented in open cultural records, but no cited field assessment of its current vitality has been added here yet.

How do I cite or share this Shaktivale vs Turevale entry?

Cite as: "Shaktivale vs Turevale." folkroom, https://folkroom.org/art-forms/shaktivale-vs-turevale, text CC BY-SA, with attribution.

Share or cite this roomNo tracking · CC BY-SA 4.0
WhatsAppXLinkedInRedditFacebook

The tradition & historical record

3 min read · 2 sources

शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले या कलेचा उगम व ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट सांगताना आपल्याला कोकणातील शाहीर परंपरा, डफावरील गायकी, आणि सवाल-जवाब जुगलबंदी परंपरा या तिन्हींचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. 1

इतिहास व कालखंड

"शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले" ही परंपरा सुमारे 300-400 वर्षांपूर्वीपासून कोकणात प्रचलित असल्याचे स्थानिक संशोधकांचे मत आहे. मराठा काळातील (१७व्या शतक) शाहीर परंपरा, तोंडी साहित्य, आणि धार्मिक व सामाजिक प्रबोधन करण्यासाठी या कलेचा वापर होत असे. कोकणातील जत्रा, यात्रांमध्ये धार्मिक कथा व प्रबोधनासाठी "सवाल-जवाब गायकी" ही पद्धत लोकप्रिय झाली. शिवकालीन (छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात) लोकांना जागृत करण्यासाठी शाहीर डफावरील परखड गाण्यांचा वापर करीत.जनजागृती, इतिहास,संस्कृती जतन करीत. या पद्धतीतूनच "शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले" ची रुजवात झाली.हि दोन शक्ती आदिशक्ती शिव कला संबोधली जाते. पुराणकथांतील वादविवाद (उदा. ज्ञानेश्वरीतील संवाद, तुकाराम-शिवाजी महाराज भेट) यांचे लोकसंस्कृतीत प्रतिबिंब म्हणून ही परंपरा पुढे आली. उगमकाल:- सुमारे १७व्या शतकातील मराठाकाळ. कलेचा प्रकार:- सवाल-जवाब गायकी व जुगलबंदी. पार्श्वभूमी:- शाहीर परंपरा, डफावरील गायकी व पुराणकथांतील संवादात्मक वादविवाद. सांस्कृतिक भूमिका:- धार्मिक जागृती, समाजप्रबोधन, लोकसंगीताचा प्रसार. 1

ऐतिहासिक पार्श्वभूमी

शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले या कलेचा उगम शाहीर परंपरा|शाहीर परंपरेतून झाला आहे. तोंडी साहित्यकृतीच्या माध्यमातून धार्मिक कथा, सामाजिक विषय व प्रबोधनपर विचार गावागावांत पोहोचवण्याचे हे प्रभावी माध्यम ठरले. इतिहासतज्ञांच्या मते, ही परंपरा मध्ययुगीन काळात कोकणातील ग्रामीण समाजजीवनाचा भाग होती. 1

सादरीकरणाची पद्धत

या कलेमध्ये दोन गट असतात: शक्तीवाले: गायनातील ताकद, शब्दसामर्थ्य, वाकपटुत्व व सुरेलता यांच्या जोरावर संवाद साधणारा गट.आदीशक्ती एक रूप असते. तुरेवाले: वाद्यांच्या ठेक्यावर चपळतेने संवाद करणारा, लयबद्धता व ठसकेबाज सादरीकरण करणारा गट.आदिशक्तीचे दुसरे रूप असते. संपूर्ण सादरीकरण सवाल-जवाब गायकीच्या पद्धतीने केले जाते. प्रत्येक गट आपली बारी आल्यावर समोरच्या गटाला प्राचीन ग्रंथ, धार्मिक कथा, सामाजिक प्रश्न अथवा वाकपटुत्वावर आधारित प्रश्न विचारतो. समोरचा गट त्याचे उत्तर आपल्या बारीत - गायकीच्या माध्यमातून देतो व पुढे नव्या प्रश्नाच्या स्वरूपात मांडण्याचा पुढाकार घेतो. सवाल-जवाबांच्या या सत्रात डफ (वाद्य), ढोलकी, झांझ व तुरे या पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे सादरीकरणाला ठसकेबाज व प्रेक्षकांना भारावून टाकणारे स्वरूप मिळते. 1

सांस्कृतिक महत्व

समाजप्रबोधन व लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम. प्राचीन ज्ञान व तत्त्वज्ञान सहजगत्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग. गावकुसातील सांस्कृतिक एकात्मता व लोकसहभाग वाढवणारे लोककलाप्रकार. 1

आधुनिक काळातील स्थिती व परंपरेचे जतन

आजच्या काळातदेखील "शक्तीवाले विरुद्ध तुरेवाले" ही परंपरा कोकणातील गौरी-गणपती उत्सव, जत्रा, ग्रामदैवताच्या पूजाविधी अशा पारंपरिक सणांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत शक्तीतुरा जुगलबंदीचे कार्यक्रम अजूनही पाहायला मिळतात. 1. गौरी-गणपती सणातील विशेष महत्त्व - गौरी-गणपतीच्या रात्री ‘शक्तीतुरा’ जुगलबंदी सादर केली जाते. गावातील जुनी माणसं (अधिक जाणकार शाहीर, वयोवृद्ध लोककला कलाकार) एकत्र येऊन, नव्या पिढीतील गायक व वादकांशी सवाल-जवाब करतात. हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर 'ज्ञानाच्या पडताळणीसाठी' (Knowledge Duels) आयोजित केला जातो. वाद्यांचे ठोके, गायनातील ताकद, प्रश्नांची चातुर्यता व उत्तरातील सखोलता पाहून गावातील लोक ठरवतात की, "शक्तीवाले सरस की तुरेवाले?" 2. बारी ठेवण्याची परंपरा (Bari Tradition) - काही गावांमध्ये शक्तीवाले व तुरेवाले यांच्या "बारी" (सादरीकरणाची पाळी) पारंपरिक स्वरूपात ठेवली जाते. एका वर्षी शक्तीवाल्यांची पहिली बारी, पुढच्या वर्षी तुरेवाल्यांची—असा परंपरा चालते. या बारीमध्ये वयोवृद्ध कलाकार नवीन पिढीला प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञान व शब्दसामर्थ्याची चाचणी घेतात. अनेक ठिकाणी आजही हे कार्यक्रम "रात्रभर चालणाऱ्या जुगलबंदीच्या स्वरूपात" होतात. 3. जुनी माणसे व परंपरेची जबाबदारी - कोकणातील जुन्या पिढीतील शाहीर व वादक अजूनही या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा उद्देश केवळ कला जपणं नाही, तर त्यामागील "ज्ञान, धर्म, वाकपटुत्व, सामाजिक जाणीवा" या मर्माचा वारसा पुढील पिढीला देणे हा आहे. कला ही केवळ करमणुकीची बाब नसून "ज्ञानाच्या प्रश्नोत्तरांची चाचणी" कशी असते, याचा अनुभव या परंपरेतून गावकऱ्यांना मिळतो. 1

The text above is adapted from the Wikipedia article “शक्तीवाले व तुरेवाले (लोककला)”, available under the Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 licence. 1

Shaktivale vs Turevale is a traditional Konkani folk art form involving musical question-answer duels, according to the structured record cited below. This entry was generated automatically from that record and has not yet been reviewed by a person familiar with the tradition. 2

No recording linked yet — know one? Point at it →
Sourced or Silent · Still Open

Questions awaiting a cited source

+ Answer with a source →
How many people perform it today?
When is it first attested, and by whom?
What does it look like? No licensed photograph yet.